श्री विठ्ठलाची आरती
येई हो विठ्ठले माझे
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ।
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहे ॥ धृ ॥
आलिया गेलिया हाती धाडी निरोप ।
पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ १ ॥
पिवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ।
गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला ॥ २ ॥
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा जीवेभावे ओवाळी ॥ ३ ॥