मजकुराकडे जा
100%

महालक्ष्मीची आरती

आरती महालक्ष्मीची

जयदेवी जयदेवी जय लक्ष्मीमाता ।
प्रसन्न होऊनिया वर देई आता ॥ धृ ॥

विष्णुप्रिये तुझी सर्वांतरी सत्ता ।
धन दौलत देई लक्ष्मीव्रत करिता ॥ १ ॥

विश्वव्यापक जननी तुज ऐसी नाही ।
धावसी आम्हालागी पावसी लवलाही ॥ २ ॥

त्रैलोक्य धारिणी तू भक्ता लाभे सुखशांती ।
सर्व सर्वही दुःख सर्व ती पळती ॥ ३ ॥

वैभव ऐश्वर्याचे तसेच द्रव्याचे ।
देसि दान वरदे सदैव सौख्याचे ॥ ४ ॥

यास्तव अगस्ती बन्धु आरती ओवाळी ।
प्रेमे भक्तासवे लोटांगण घाली ॥ ५ ॥