श्री दत्ताची आरती
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेति नेति शब्द नये अनुमाना ।
सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता ।
आरती ओवाळितां हरली भवचिंता ॥ धृ ॥
सबाह्य अभ्यंतरी तूं एक दत्त ।
अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।
पराही परतली तेथे कैंचा हा हेत ।
जन्ममरणाचा पुरलासे अंत ॥ २ ॥
दत्त येऊनियां उभा ठाकला ।
सद्भावे साष्टांगेसीं प्रणिपात केला ।
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥ ३ ॥
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हारपलें मन झालें उन्मन ।
मी तूं पणाची झालीं बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्त जाण ॥ ४ ॥