श्री रामाची आरती
त्रिभुवन मंडितमाळ
त्रिभुवन मंडितमाळ शोभतो गळा (२) ।
आरती ओवाळू पाहू ब्रह्म पुतळा (२) ॥ १ ॥
बोलो श्रीराम जयराम जयजय राम (२) ।
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम (२) ॥ २ ॥
ठकारांचे ठाण करी धनुष्य बाण (२) ।
मारूती सन्मुख उभा कर जोडून (२) ॥ ३ ॥
भरत शत्रूघ्न दोघे चौऱ्या ढाळीती (२) ।
स्वर्गाहून देव पुष्पवृष्टी करीता (२) ॥ ४ ॥
रत्नखचित माणिक वर्णू काय मुकूटी (२) ।
आरती ओवाळू चौदा भुवनाच्या पोटी (२) ॥ ५ ॥
विष्णूदास नामा म्हणे मागतो तू दे (२) ।
आरती ओवाळू पाहू सितापतीते (२) ॥ ६ ॥