मजकुराकडे जा
100%

श्री साईबाबांची आरती

आरती साईबाबा

आरती साईबाबा । सौख्य दातार जीवा ।
चरण रजतळी द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा ॥ धृ ॥

जाळुनिया अनंग सस्वरूपी राहे दंग ।
मुमुक्षजना दावी निज डोळा श्रीरंग ॥ १ ॥

जयामनी जैसा भाव, तया तैसा अनुभव ।
दावीसी दयाघना ऐसी तुझी ही माव ॥ २ ॥

तुमचे नाम घेता, हरे संसृती व्यथा ।
अगाध तव करणी, मार्ग दावीसी अनाथा ॥ ३ ॥

कलियुगी अवतार, सगुणब्रह्म साचार ।
अवतीर्ण झालासी, स्वामी दत्त दिगंबर ॥ ४ ॥

आठादिवसा गुरुवारी, भक्त करीती वारी ।
प्रभूपद पहावया, भवभय निवारी ॥ ५ ॥

माझा निजद्रव्य ठेवा, तव चरणरज सेवा ।
मागणे हेची आता, तुम्हा देवाधी देवा ॥ ६ ॥

इच्छित दिन चातक, निर्मळ तोय निज सुख ।
पाजावे माधवा या, सांभाळ आपुली भाक ॥ ७ ॥