मजकुराकडे जा
100%

श्री नित्यानंद महाराजांची आरती

आरती नित्यानंदाची

श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय ।

जय जय आरती नित्यानंद राया । सगुणरूपी गोविंदा ॥ धृ ॥

प्रथमा दत्तरूप घेसी । द्वितीया श्रीपाद होसी ।
तृतीया नरहरी बनसी । त्या गाणगापुरी लिला दावीसी ॥ १ ॥

महाडीक प्रभू तू होसी । अक्कलकोट स्वामी बनसी ।
शिर्डी साईनाथ होसी । त्या गणेशपुरी तू वससी ॥ २ ॥

वो ऐसे अनेक रूप तू घेसी । त्या कनकवली भालचंद्र होसी ।
त्या शेगावी गजानन होसी । त्या बाळांना बहू आवडशी ।
त्या बाळांच्या इच्छा पुरविशी ॥ ३ ॥

पावना शंभो, पतित पावना शंभो ।
ये रं वनमाळी सावळ्या, नारायणा हरी, या भक्तजना सांभाळी ।
सावळ्या ये रं वनमाळी पावना ॥

पावना दत्ता दत्ता दत्ता पावना दत्ता, पावना दत्ता पतित पावना दत्ता ॥

वंदीला बोलो, आज्ञा वंदीला बोलो ।
वो भजे राजे गोविंद, भजे राजे गोविंद ॥

आले भजनी मोर नाचतो अंगणी, पायाकडे पाहुनी ।
पायाकडे पाहुनी नाचतो पायाकडे पाहुनी । वो आले ॥

लाल फुलांचा मऊ बिछाना साईंना झोप लागेना ।
गोविंद बोलो हरी, गोपाळ बोलो ।
राधा रमण हरी गोपाळ बोलो ।
पायी हळूहळू चाला मुखाने साईनाम बोला ॥