संत एकनाथांची आरती
आरती एकनाथा
आरती एकनाथा, आरती एकनाथा ।
महाराजा समर्थ, राजा समर्थ ।
त्रिभुवनी तुच थोर, जगद्गुरू जगन्नाथा, गुरू जगन्नाथा ॥ १ ॥
एकनाथ नाम सार, एकनाथ नाम सार ।
वेद शास्त्रांचे गुंज, शास्त्रांचे गुंज ।
दुःखनासे, महामंत्राचे बीज, मंत्राचे बीज ॥ २ ॥
एकनाथ नाम घेता, एकनाथ नाम घेता ।
सुख वाटले चित्ता, वाटले चित्ता ।
अनंत गोपाळदास, धनी नपुरे गाता, नपुरे गाता ॥ ३ ॥