संत तुकारामांची आरती
आरती तुकारामा
आरती तुकारामा, आरती तुकारामा ।
स्वामी सद्गुरू धामा, सद्गुरू धामा ।
सच्चिदानंद मूर्ती, पाय दाखवी आम्हा, दाखवी आम्हा ॥ १ ॥
राघवे सागरात, राघवे सागरात ।
पाषाण तारीले, पाषाण तारीले ।
तैसे हे तुकोबाचे, अभंग उदकी रक्षीले, उदकी रक्षीले ॥ २ ॥
तुकीता तुलनेसी, तुकीता तुलनेसी ।
ब्रह्म तुकासी आले, तुकासी आले ।
म्हणुनी रामेश्वर, चरणी मस्तक ठेविले, मस्तक ठेविले ॥ ३ ॥