समर्थ रामदासांची आरती
आरती रामदासा
आरती रामदासा, आरती रामदासा ।
भक्त विरक्त ईर्षा, विरक्त ईर्षा ।
उगवला ज्ञानसूर्य, उजळोनी प्रकाश, लोनी प्रकाश ॥ १ ॥
साक्षात शंकराचा, साक्षात शंकराचा ।
अवतार मारूती, अवतार मारूती ।
कलिमाजी तेचि झाली, रामदासांची मूर्ती, दासांची मूर्ती ॥ २ ॥
विसहो दशकांचा, विसहो दशकांचा ।
दासबोध ग्रंथ केला, बोध ग्रंथ केला ।
जडजीवा उद्धरीले, नृप शिवासी तारीले, शिवासी तारिले ॥ ३ ॥
ब्रह्मचर्य व्रत ज्याचे, ब्रह्मचर्य व्रत ज्याचे ।
रामरूप सृष्टी पाहे, रूप सृष्टी पाहे ।
कल्याण तिन्ही लोकी, स्वामी सद्गुरू पाहे, सद्गुरू पाहे ॥ ४ ॥