मजकुराकडे जा
100%

श्री विठ्ठल दशावताराची आरती

आरती दशावताराची

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ।
भक्त संकटी नाना स्वरूपी स्थापिसी स्वधर्म ॥ १ ॥

अंबऋषिकारणे गर्भवास सोशीसी ।
वेद नेले चोरूनि ब्रह्मा आणुनिया देसी ।
मत्स्यरूपी नारायण सप्तही सागर धुंडीसी ।
हस्त लागता तुझा शंखासुरा वर देसी ॥ २ ॥

रसातळासी जाता पृथ्वी पाठीवर घेसी ।
परोपकारासाठी देवा कासव झालासी ।
दाढे धरूनी पृथ्वी नेता वराहरूप होसी ।
प्रल्हादा कारणे नरहरि स्तंभी गुरगुरसी ॥ ३ ॥

पाचवे अवतार बळीच्या द्वाराला जासी ।
भिक्षे स्थळ मागुनी बळीला पाताळा नेसी ।
सर्व समर्पण केले म्हणुनी प्रसन्न त्या होसी ।
वामनरूप धरूनी बळीच्या द्वारी तिष्ठसी ॥ ४ ॥

सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला ।
कष्टी ते रेणूका म्हणुनी सहस्त्रार्जुन वधीला ।
निःक्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला ।
सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥ ५ ॥

मातला रावण सर्वा उपद्रव केला ।
तेहतीस कोटी देव बंदी हरले सीतेला ।
पितृवचनासाठी रामे वनवास केला ।
मिळोनी वानरसेना राजाराज प्रगटला ॥ ६ ॥

देवकी वसुदेव बंदी मोचन त्वा केले ।
नंदाघरी जावूनी निजसुख गोकुळा दिधले ।
गोरस चोरी करता नवलक्ष गोपाळ मिळविले ।
गोपिकांचे प्रेम देखुनी श्रीकृष्ण भुलले ॥ ७ ॥

बौद्ध कलंकी कलयुगी झाला अधर्म हा अवघा ।
सोडून दिधला धर्म म्हणुनी न दिरासी देवा ।
म्लेंच्छमर्दन करीसी म्हणुनी कलंकी केशवा ।
बहिरवी जान्हवी निज सुखनंदाची सेवा आरती ॥ ८ ॥