एकवीरा देवीची आरती
येई हो एकवीरा देवी
येई हो एकवीरा देवी माझे माउली ये ।
माझे माऊली ये ।
दोन्ही कर जोडूनि तुमची वाट मी पाहे ॥ धृ ॥
आलीया गेलीया अंबे धाडी निरोप ।
कार्ल्यामध्ये आहे माझी एकवीरा माय ॥ १ ॥
पिवळी साडी ही कैसी गगनीं झळकली ।
अंबे गगनीं झळकली ।
व्याघ्रावरी बैसोनि माझी एकवीरा देवी आली ॥ २ ॥
एकवीराचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ।
एकवीरा देवी नाम तुमचे भावें ओवाळी ॥ ३ ॥