मजकुराकडे जा
100%

श्री ज्ञानेश्वरांची आरती

आरती ज्ञानराजा

आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा ।
सेविती साधुसन्त मनू वेधला माझा ॥ धृ ॥

लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी ।
अवतार पांडुरंग नाम ठेवीले ज्ञानी ॥ १ ॥

कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी ।
नारद तुम्बरहू साम गायन करी ॥ २ ॥

प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले ।
रामा जनार्दनी पायी टकची ठेले ॥ ३ ॥