श्री गणपतीची आरती
उंदरावर बैसोनी
उंदरावर बैसोनी दुडदुडां येसी ।
हाती मोदक लाडू घेउनियां खासी ।
भक्तांचे संकटी धावुनियां पावसी ।
दास विनवीती तुझिया चरणांसी ॥ १ ॥
जय देव जय देव जय गणराया ।
सकळ देवांआधीं तूं देव माझा ॥ धृ ॥
भाद्रपदमासीं होसी तूं भोळा ।
आरक्त पुष्पांच्या घालुनियां माळा ।
कपाळी लावुनि कस्तुरी टिळा ।
तेणें तूं दिससी सुंदर सावळा ॥ २ ॥
प्रदोषांचे दिवशी चंद्र शापिला ।
समर्थी देव मोठा आकांत केला ।
इंदु येवोनी चरणीं लागला ।
श्रीरामा बहुत शाप दिधला ॥ ३ ॥
पार्वतीच्या सूता तूं ये गणनाथा ।
नेत्र शिणले तुझी वाट पाहतां ।
किती अंत पाहसी बा विघ्नहर्ता ।
मजला बुद्धी देई तूं गणनाथा ॥ ४ ॥