मजकुराकडे जा
100%

आरतीनंतरचे प्रार्थना श्लोक

सदा सर्वदा योग तुझा घडावा

सदा सर्वदा योग तुझा घडावा ।
तुझे कारणी देह माझा पडावा ।
उपेक्षु नको गुणवंता अनंता ।
रघुनायका मागणे हेचि आतां ॥ १ ॥

जय जय रघुवीर समर्थ ॥

उपासनेला दृढ चालवावें ।
भूदेव संतांसी सदा नमावें ।
सत्कर्म योगे वय घालवावें ।
सर्वामुखी मंगल बोलवावें ॥ २ ॥

कैलासराणा शिव चंद्रमौळी ।
फणिंद्र माथा मुकुटी झळाळी ।
कारुण्य सिंधू भवदुःखहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३ ॥

मोरया मोरया मी बाळ तान्हें ।
तुझीच सेवा करु काय जाणे ।
अन्याय माझे कोट्यानुकोटी ।
मोरेश्वरा बा तू घाल पोटी ॥ ४ ॥

ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे ।
त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे ।
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ।
तेथे तुझे सदगुरू पाय दोन्ही ॥ ५ ॥

अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र ।
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र ।
तया आठविता महापुण्यराशी ।
नमस्कार माझा सदगुरू ज्ञानेश्वराशी ॥ ६ ॥