मजकुराकडे जा
100%

श्री शंकराची आरती

लवथवती विक्राळा

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ।
लावण्य सुन्दर मस्तकी वाळा ।
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्री शंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥ धृ ॥

कर्पूरगौरा भोळा नयनी विशाळा ।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।
विभुतीचे उधळण शितकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ २ ॥

देवी दैत्य सागर मंथन पै केले ।
त्यामाजी अवचीत हलहल जे उठले ।
ते त्वा असुरपणे प्राशन केले ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥ ३ ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी ।
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटीळक रामदासा अंतरी ॥ ४ ॥